Home
About Us

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभागीय मंडळ, नागपूर

नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा इतिहास :
सन 1922 साली सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार हायस्कुल ऐज्युकेशन अॅक्ट अन्वये पहिले परिक्षा मंडळ स्थापन झाले. त्यावेळी मंडळाचे नाव "बोर्ड ऑफ हायस्कुल ऐज्युकेशन , सेंट्रल प्राव्हिन्सेस अँड बेरार " असे होते . त्यानंतर सण १९५१ ला एम.पी. ऐज्युकेशन अॅक्ट पास होऊन त्या अन्वये माध्यमिक शालांत मंडळाला स्वायत्त मंडळाचा दर्जा देण्यात आला. या मंडळाने 1953 पासून माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी मंडळाचे नाव "बोर्ड ऑफ सेकंडरी ऐज्युकेशन, मध्यप्रदेश" असे होते.

राज्य पुनर्रचनेच्या वेळी 1956 मध्ये मध्यप्रदेश व विदर्भ या 2 विभागासाठी मध्यप्रदेश स्टेट्युटरी बोर्ड अॅक्ट 1956 अन्वये शिक्षण मंडळाचे विभाजन करून विदर्भासाठी एक स्वतंत्र व महाकोशल विभागासाठी दुसरे स्वतंत्र बोर्ड निर्माण करण्यात आले. त्यावेळी या मंडळाचे "विदर्भ बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, नागपूर (Bombay State)" असे नामनिधान करण्यात आले. सण १९६० ला भाषावार प्रांत रचनेच्यावेळी या मंडळाचे नांव " विदर्भ बोर्ड ऑफ सेकंडरी ऐज्युकेशन, महाराष्ट्र स्टेट, नागपूर " असे नामनिधान करण्यात आले.

यानंतर महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन बोर्ड्स ऍक्ट १९६५ अन्वये पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या ३ विभागीय मंडळाची केवळ माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यासाठी रचना करण्यात आली राज्य मंडळाकडे इयत्ता 8 ते 10 वि पर्यंतचा अभ्यासक्रम ठरविणे,पाठ्यपुस्तके तयार करणे, महाराष्ट्रातील पुणे, नागपूर व औरंगाबाद ह्या तिन्ही विभागीय मंडळामध्ये समन्वय साधने इत्यादी काम देण्यात आली . राज्य मंडळ व तिन्ही विभागीय मंडळे यांचे कामकाज 1 जानेवारी 1966 पासून सुरु झाले. त्यावेळी या विभागीय मंडळाचे नांव "महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी ऎज्युकेशन, नागपूर डिव्हिजनल बोर्ड, नागपूर" असे होते व नागपूर विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, व वर्धा असे 8 जिल्हे होते.

सण 1972 पासून महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट् राज्यात सुधारित 10+2+3 अभ्यासक्रम अंमलात आणला. सण 1975 साली 3 विभागीय मंडळाची परीक्षा समान अभ्यासक्रमानुसार व पाठ्यपुस्तकावर आधारित प्रथमच घेण्यात आली. सण १९७६ ला सदर अॅक्टमध्ये सुधारणा झाल्यामुळे या मंडळाचे नांव "महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चं माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभागीय मंडळ, नागपूर" असे करण्यात आले. त्यानंतर 1977 साली 10+2+3 शिक्षण प्रणालीनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा देखील घेण्याचे कार्य विभागीय मंडळाकडे सोपविल्यामुळे हि परीक्षा देखील समान अभ्यासक्रमावर आधारित संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी घेण्यात आली.

विद्यार्थ्यांची वाढणारी संख्या पाहता महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 1981 साली नागपूर विभागीय मंडळाचे उपकार्यालय, अमरावती येथे सुरु करण्यात आले.
सण 1991 ला अमरावती येथील उपकार्यालयाला स्वतंत्र विभागीय मंडळाचा दर्जा देण्यात आला व या विभागीय मंडळास अमरावती, अकोला, बुलढाणा व यवतमाळ हे चार जिल्हे जोडण्यात आले.
नागपूर विभागीय मंडळाच्या कक्षेत सद्या नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया अशा सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.